- Advertisement -
गुन्हा घडण्याआधीच गुन्हेगाराला पकडणार, गणपती विसर्जनासाठी पुणे पोलिसांचा ‘AI अॅक्शन प्लॅन’ काय आहे?
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहर पोलिस दलाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उद्या सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणूकसाठी मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे आणि यामध्ये AI ची सुद्धा मदत घेण्यात येणार आहे.
यासोबतच मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संशयितांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. पाहा पुणे पोलिसांचा ‘AI अॅक्शन प्लॅन’ काय आहे?
- Advertisement -