मोठी बातमी! अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात, एका मजुराचा जागीच मृत्यू – marathi actress urmila kanetkars car hit 2 metro workers one dead severely injuring the other

Date:

- Advertisement -


Urmila kanetkars car hit 2 metro workers :लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अभिनेत्री गंभीर जखमी झाली असून कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: मराठी सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. उर्मिलाच्या कारनं दोन मजुरांना धडक दिल्याची माहिती आहे. तर या धडकेत एका मजुराचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. तर उर्मिला देखील अपघातात जखमी असल्याचं म्हटलं जात आहे.
कुठे घडला अपघात?
मुंबईतल्या कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. रस्त्यावर मेट्रो कामगार काम करत असताना उर्मिलाच्या कारनं त्यांना धडक दिली. यात एका मेट्रो मजुराचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. शूटिंगवरून परत येत असताना हा अपघात घडला. उर्मिलाचा ड्रायव्हर कार चालवत होता. ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

तपास सुरू

पोईसर मेट्रो स्टेशनजवळ हा अपघात घडला. मेट्रोच्या दोन मजुरांना कारनं धडक दिल्यानं एका मजुराचा मृत्यू झाला आहे, पोलिसांनी उर्मिलाच्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

एअर बॅगमुळे वाचला जीव
तर कारमधील एअर बॅग वेळेत उघड्यानं उर्मिलाचा जीव वाचल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तिच्या कारचा चक्काचुर झाला आहे. उर्मिलाच्या तब्येतीविषयी आणखी माहिती मिळू शकली नाहीये.
चाहत्यांना धक्का
उर्मिलाच्या अपघातानं चाहत्यांना धक्का बसला असून, चाहत्यांनी तिच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

मोठी बातमी! अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात, एका मजुराचा जागीच मृत्यू

उर्मिला कोठारे हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकली होती. लेकीच्या जन्मानंतर सिनेइंडस्ट्रीतल्या कामातून ब्रेक घेत तिनं या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. उर्मिलानं अनेक मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. पण दुनियादारी आणि कांकण सिनेमातल्या तिच्या भूमिका विशेष गाजल्या.

दरम्यान, उर्मिला नुककतीच दुबई ट्रीपवर परतली होती. या ट्रीपचे अनेक फोटो, व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”… आणखी वाचा



Source link

- Advertisement -

Top Selling Gadgets

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six − one =

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Access Denied

Access Denied You don't have permission to access...

Wall St Week Ahead-US stocks to be tested by Tesla, Netflix earnings and delayed CPI report

Q3 earnings pick up, Netflix on Tuesday, Tesla...

Top Stories: New M5 MacBook Pro, iPad Pro, and Vision Pro

Apple's M5 chip is here, making a splash...

Top Selling Gadgets