Dr. Girish oak and Pallavi oak lovestory: ‘आम्ही सारे खवय्ये’ या शोचा नवीन सीझन नुकताच सुरू झालाय. या शोमध्ये सध्या सेलिब्रिटी कपल हजेरी लावताना दिसत आहेत. आता डॉ.गिरीश ओक आणि त्यांची पत्नी पल्लवी ओक यांनी हजेरी लावली होती.

बसमध्ये झालेली पहिली भेट
तर गिरीश आणि पल्लवी यांची पहिली भेट ही बसमध्ये झाल्याचं त्यांनी सांगितलं.पल्लवी ओक यांनी सांगितलं की, आम्ही पुणे – मुंबई असा प्रवास करत होतो . मी आधीच बसमध्ये बसलेले होते आणि कर्वे रोडला गिरीश आला. मी त्याला पाहिलं तेव्हा म्हटलं की,अभिनेते डॉ. गिरीश ओक बसने वगैरे कसा प्रवास करतायत. मी नंतर माझ्या एका मैत्रिणीलाही फोन केला, तिला सांगितलं माझ्या बसमध्ये गिरीश ओक आहे, तिलाही आश्चर्यच वाटलं.
माझ्यात रंग ना रूप, पैसा -नोकरी नाही… का म्हणून पसंत केलं मला ? कुशलचा बायकोला प्रश्न, सुनयनानं दिलं असं उत्तर की…
बसमधल्या जागांची आदलाबदल झाली अन् आम्ही एकमेकांच्या बाजूला बसलो. मुंबईत वांद्र्यात आल्यानंतर माहिती नाही, पण मी त्याला म्हटलं की, मला तुमचा फोन नंबर मिळेल का? आणि त्यानं नंबर दिला मला…
लग्नाला होता विरोध
तर आमचं लग्न नाट्यमयरीतीनं झालं होतं, असं पल्लवी यांनी सांगितलं. पल्लवी यांच्या आई-वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यामुळं तेव्हा विरोधात जात लग्न केल्याचं गिरीश ओक यांनी सांगितलं.
डॉ.गिरीश ओक यांच्याबद्दल..
तर डॉ.गिरीश ओक हे मूळचे नागपूरकर आहेत. अभिनेते, कवी, लेखक म्हणून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. आयुर्वेद वैद्यकीय कॉलेजमध्ये त्यांनी डॉक्टरकीची डिग्री घेतली. काही वर्ष प्रॅक्टीस केल्यानंतर त्यांनी अभिनयाचा मार्ग निवडला. मालिका, नाटकांमधून त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. पद्मश्री पाठक यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना गिरीजा ही मुलगी झाली. परंतु काही वर्षानंतर गिरीश आणि पद्मश्री यांचा घटस्फोट झाला. गिरीजा देखील आज मराठी सिनेसृष्टीतल प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पद्मश्री यांना घटस्फोट दिल्यानंतर २३ मार्च २००८ रोजी गिरीश यांनी पल्लवी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यांना दुर्गा नावाची मुलगी आहे.