गेल्या १५ दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाकडून डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मोठा धक्का देण्यात आला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनमोल म्हात्रे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला आहे तर गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे सेनेचे दिपेश म्हात्रे यांनी भाजपात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले होते. अमनोल म्हात्रे हे शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांचे पुत्र आहेत. वामन म्हात्रे हे कल्याण डोंबिवलीचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते. दरम्यान, अनमोल म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल भाजपकडून गुप्तता पाळण्यात आली होती. भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनमोल म्हात्रे यांचा भाजपचा प्रवेश झाला आहे.



