“इंद्र जिमि जंभ पर…”, इंग्रजी रॅप ऐकवून हिणवलं, मराठी मुलीने शिवगर्जना करत दिलं जशास तसं उत्तर – Marathi News | kamali marathi serial new promo of marathi giral sing shivgarjana and slam english rap

0
12
Advertisement


झी मराठीवर नवी मालिका सुरु होत आहे त्या मालिकेचं नाव ‘कमळी’. या मालिकेची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. नुकतंच आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आलाय. हा प्रोमो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अभिनेत्री विजया बाबरचा उत्कृष्ट अभिनय या मालिकेच्या प्रोमोत बघायला मिळतोय. जाणून घ्या

‘कमळी’ मालिकेचा नवीन प्रोमो 

‘कमळी’ मालिकेच्या नवीन प्रोमोत शिक्षणाच्या ध्यासामुळे कमळी मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेते. ग्रामीण भागात वाढलेली कमळी शहरातील कॉलेजच्या वेगळ्या वातावरणात गोंधळून जाते. कोणी तिला धक्का मारतं, तर कोणी चिडवतं. अशात कमळीचा एका मुलीला धक्का लागतो. “तायडे, फर्स्ट इयरचा क्लास कुठेय?” असं ती त्या मुलीला विचारते. मग ती शहरातील मुलगी कमळीच्या खांद्यावर हात टाकून मुद्दाम तिला सर्वांसमोर घेऊन जाते. “तू कोण? कुठुन आलीस? तुझं नाव काय?” असे प्रश्न विचारुन सर्वजण कमळीला भांबावून सोडतात.

कमळी जिला धक्का मारते, ती मुलगी सर्वांसमोर रॅप साँग सादर करुन कमळीला हिणवते. पुढे कमळीच्या आतला स्वाभिमान जागा होतो. ती सर्व कॉलेजसमोर बुलंद आवाजात छत्रपती शिवरायांची महती सांगणारं गीत सादर करते. “इंद्रजिमि जंभ पर…” अशी सुरुवात करुन कमळी तिचं गाणं सादर करत. कमळीचं गाणं संपताच उपस्थित सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करुन तिचं कौतुक करतात. त्यामुळे रॅप साँग सादर करणारी मुलगी दुखावली जाते. अशाप्रकारे ‘कमळी’ मालिकेचा प्रोमो पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ही नवी मालिका लवकरच झी मराठीवर सुरु होणार आहे.

Web Title: kamali marathi serial new promo of marathi giral sing shivgarjana and slam english rap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + five =